fbpx
Saturday, November 27, 2021

ठाकरे सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंना याची किंमत मोजावी लागेल दरेकरांचा इशारा!

 

अलिबाग, 4 ऑक्टोबर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलीसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. भाजपानं महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.  ठाकरे सरकारने पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला राज्य सरकारला दिला आहे .

तर  अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ही बातमी समजल्यानंतर आमदार राहुल नार्वेकर, रवी पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या हे प्रमुख नेते अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. अन्वय नाईक यांच्या परिवाराला न्याय जरुर मिळाला पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून अर्णव गोस्वामी यांना अटक केली, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे .

अर्णव गोस्वामी हे केवळ निमित्तमात्र आहे. भाजप हा त्यांच्या बाजूने नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या बाजूने उभा आहे. उद्या कोणत्याही पत्रकारावर अशाप्रकारे कारवाई झाली तर भाजप पक्ष इतक्याच ठामपणे उभा राहील. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांच्या निमित्ताने भाजपवर पोटशूळ काढण्याचे काही कारण नाही. राज्य सरकारकडून सोयीचं राजकारण आणि कायदा सोयीने वापरला जातोय. मात्र, भाजप राज्य सरकारला लोकशाहीतीली स्वातंत्र्याचा गळा घोटून देणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »