fbpx
Saturday, October 23, 2021

पेट्रोल डिझेल च्या किंमतीत वाढ सुरूच, हे आहेत आजचे दर……

पेट्रोल डिझेल च्या किंमतीत वाढ सुरूच, हे आहेत आजचे दर……
देशात कोरोना व्हायरसमुळे सध्या तेलांच्या किमती वाढताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग तेराव्या दिवशी वाढ झाली आहे. शुक्रवारी 19 जून रोजी पेट्रोलचे दर 0.56 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर 0.63 रुपयांनी वाढले आहेत.
देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत. तर डीझेलची किंमत वाढून 77.06 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. याचसोबत पेट्रोलच्या किमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोलचे दर 85.21 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 75.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 81.22 रूपये प्रति लिटर आणि 74.77 रूपये एवढे झाले आहेत. तसेच कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे 80.13 रूपये प्रति लिटर आणि 72.53 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर 80.91 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 73.28 रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »