fbpx
Saturday, October 23, 2021

केंद्र सरकारची नवीन योजना, आता पेट्रोल डिझेल नाहीतर या वर धावणार वाहने……..

केंद्र सरकारची नवीन योजना, आता पेट्रोल डिझेल नाहीतर या वर धावणार वाहने……..
पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन सीएनजीच्या वापराबाबत केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे, याबाबत रस्ते आणि वाहतूक विभागाकडून एक आराखडा बनवण्यात आला आहे त्यात ऑटोमोबाईल इंधनाच्या स्वरुपात हायड्रोजन सीएनजीचा समावेश करण्याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायदा १९७९ यात सुधारणा करण्यात येणार आहे.
वातावरणात वाढणारं प्रदुषण पाहता ऑटोमोबाईल कंपन्या आणि सरकार अनेक रणनीतीवर सध्या काम करत आहे. अशातच इंधनाला पर्याय म्हणून हायड्रोजन सीएनजीचा विचार पुढे येऊ लागला आहे. यासाठी सरकारने इंधनाच्या रुपात HCNG चा वापर करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. इंधनाच्या वापरात सीएनजी हे सर्वात व्यवहार्य मानले जाते, विशेषत: देशातील अनेक शहरांमध्ये योजना आखली गेली आहे.
काय आहे HCNG?
एचसीएनजी कंप्रेस्ड नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजनचे मिश्रण आहे. कंपोजिशन फिगरबद्दल बोलल्यास, या इंधनात १८ टक्के हायड्रोजनचे मिश्रण असते. हे इंजिन ऑप्टिमायझेशननंतर, हेवी ड्यूटी सीएनजी वाहनात सहज वापरले जाऊ शकते. सुरुवातीच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, एचसीएनजीचा वापर कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), मिथेन आणि एकूण हायड्रोकार्बन (टीएचसी) उत्सर्जन कमी करू शकते. इंधन वापराच्या बाबतीत ते सीएनजीपेक्षा चांगले आहे.
एचसीएनजी(HCNG)चा आणखी एक फायदा म्हणजे ते सहजपणे सीएनजी पाइपलाइन आणि बस डेपोमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. एचसीएनजीच्या किटसह रेट्रोफिटेड ५० बसमध्ये दिल्लीत प्रारंभिक पायलट चाचणी होणार आहे. या पायलट प्रोजेक्टसाठी दिल्लीची निवड यासाठी केली कारण, याठिकाणी सीएनजी बस, पंप आणि सीएनजी इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे जाळे आहे. एचसीएनजीसाठी मंत्रालयाने मसुदा जनतेच्या सूचनांसाठी खुला केला आहे. नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत ईमेल किंवा पोस्टमार्गे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहसचिव (एमव्हीएल) कडे टिप्पण्या आणि मते पाठविली जाऊ शकतात.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »