fbpx
Saturday, November 27, 2021

‘मातोश्री’वर मशाल मोर्चा, तर  पंढरपुरातून आक्रोश मोर्चा; आरक्षणासाठी मराठा समाजाचा पुन्हा एल्गार!

 

मुंबई, 7 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली असून मराठा क्रांती मोर्चासह राज्यातील अनेक मराठा संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण  देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा प्रतिकात्मक मशाली घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर आज  धडकणार आहे. संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. तर पंढरपुरच्या दिशेने येणारी एसटी वाहतूकही थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. तर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुमारे 500 पोलीस तैनात असून ड्रोनद्वारे हालचालींवर नजर ठेवली जाईल. दुपारी  नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या दोन्ही मोर्चांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »