fbpx
Friday, October 22, 2021

IPL2020 DC vs SRH: सलग दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला;15 धावांनी दिल्ली कॅपिटल्सला केले पराभूत…!

अबुधाबी, 30 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या हंगामातील अकराव्या सामन्यात काल अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) सनराइजर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 15  धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाने दिल्लीसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ केवळ 147 धावापर्यंत मजल मारू शकला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात हैदराबादच्या संघाने पहिला विजय मिळवला आहे.

तर, दिल्लीच्या संघाची विजयी हॅट्रिक हुकली आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोचे, वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदबादचा संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावांचे लक्ष्य उभारले. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेयरस्टोने 53(48) आणि डेव्हिड वार्नर 45 (33) तर, केन विल्यमसनने केवळ 26 चेंडूत 41 धावा ठोकल्या आहेत. हैदराबादच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ आज डगमगताना दिसला आहे. दिल्लीच्या संघाकडून शिखर धवन याने सर्वाधिक 34 (31 ) धावा केल्या आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिल्या अकरा सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, सनराइजर्स हैदराबाद हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »