fbpx
Saturday, November 27, 2021

अजित पवारांचे धक्कातंत्र: पहाटे सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करत; अधिकाऱ्यांना केल्या सूचना..!

पुणे, 18 सप्टेंबर : पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री
आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पहाटे सहा वाजता पोहोचले होते. सहा वाजण्याच्या सुमारास शहरात येऊन
पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक
घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. पुण्यातील कोविड
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुण्यात आहेत. ही आढावा बैठक आज दुपारी होणार आहे. मात्र, पुण्यात
असल्यानं आज अचानक त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यासाठी सकाळी सहा वाजताच ते फुगेवाडीत दाखल
झाले. अजितदादा मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं समजल्यानं व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित
यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सज्ज होते. सुरुवातीला अजित पवार यांनी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत चर्चा करून
पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाची पाहणी
केली. तेथील तिकीट विक्रीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. तिथेच मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी तुकाराम नगर ते पिंपरी
असा मेट्रो प्रवास केला. ब्रिजेश दीक्षित हेही त्यांच्यासोबत होते. दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. दरम्यान, शरद
पवार आणि अजित पवार वेळेचे अतिशय पक्के आहेत. ते वेळेचे कसे पक्के आहेत याचे किस्से सांगितले जातात. एवढंच
नाही यंदा जानेवारी अखेरीस नाशिकमधल्या विकासकामांचं भूमिपूजनही त्यांनी भल्या पहाटे केल होतं.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »