fbpx
Saturday, November 27, 2021

तुमच्यात हिंमत असेल तर फिल्मसिटी नेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंच योगी आदित्यनाथ यांना जाहीर आव्हान!

 

मुंबई, 6 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या मुद्द्यावर अधुनमधून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतात. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी चित्रपट आणि करमणूक धोरणावरील वेबिनारमध्ये योगी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा, असे जाहीर आव्हानच त्यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले दिले.

तर दुसरीकडे भविष्यात महाराष्ट्र सरकार फिल्मसिटीला आधुनिक सोयी पुरवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. बॉलीवूड इंडस्ट्रीला आज काही व्यथा, वेदना असतील तर त्या दूर करणं सरकार म्हणून आमचं काम आहे. सरकार बॉलीवूड इंडस्ट्रीला हव्या त्या सोयी पुरवायला तयार आहे. मात्र, यामधून चांगला समाज घडवला गेला पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात सगळं काही आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली, त्याठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »