fbpx
Saturday, October 23, 2021

मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज..!

मुंबई, 14 सप्टेंबर : मुंबईसह राज्यातील  अनेक  जिल्ह्यात यंदा  पुरेपुर मान्सून बरसतो आहे.मराठवाड्यात तर मान्सूनने
सुरुवातीपासूनच आपली आगेकुच कायम ठेवली आहे. तर आज महाराष्ट्र हवामान अंदाजामध्ये IMD ने 24 तासांत
मराठवाडा, पश्चिम विदर्भ या भागात मध्यम ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम
किनारपट्टी असणार्‍या कोकण प्रांतामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहरात मात्र तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई हवामान
वेधशाळेचे उपा संचालक के एस होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आज पुढील 24 तासांचा हवामान अंदाज शेअर
केला आहे. यामध्ये मराठ्वाड्यापासून, विदर्भाचा काही भाग आणि कोकणात पाऊस मुसळधार बरसेल असा अंदाज
वर्तवण्यात आला आहे. तर आज पुढील काही तास लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो असा
अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात मात्र मध्यम ते तुरळक जोरदार सरी बरसतील असा अंदाज व्यक्त
करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहर आणि नजिकच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज
आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. तर मागील काही दिवस मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक जोरदार
पाऊस झाला आहे. यासोबतच वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जना झाल्याने काही नागरिक धास्तावले होते. महाराष्ट्रात
जाता-जाता पडणारा हा पाऊस काही ठिकाणी शेतीचं देखील नुकसान करत आहे. महाराष्ट्रात काही भागात मका, मूग
अशा धान्यांना हा पाऊस फटका देत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »