fbpx
Saturday, November 27, 2021

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७८ लाखांच्या पार; गेल्या २४ तासांत ५३,३७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर : जागतिक महामारी असलेल्या करोना व्हायरसचे देशासह राज्यातील वाढते  थैमान आता  काही कमी होताना दिसत असून करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची  गती आता  मंदावली आहे. पण अजूनही हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.

तर देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे. तर २३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.  देशातील करोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही केंद्रीय  आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »