fbpx
Saturday, November 27, 2021

मोठी बातमी: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर….

मोठी बातमी: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर; उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता..!
चित्रपट निघावा असं त्याचं वादळी आयुष्य असताना आता संजय दत्तला फुफ्फुसाचा  कॅन्सर झालं असल्याचं समोर आलं
आहे .  संजय दत्त काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
आला होता. मात्र, त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून दोन
दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती मिळाली . या
मोठी बातमी: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर; उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता..!
असल्याची माहिती आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस संजय दत्त शूटिंग आणि सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.
दरम्यान, याबाबत संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  तर संजय
दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार,
संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी
संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागेल. दरम्यान, संजय दत्तने मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली
होती. “मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून ब्रेक घेत आहे. माझ्यासोबत माझे कुटुंबिय आणि मित्र
परिवार आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमच्या
प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन”, असे या पोस्टमध्ये संजय दत्तने सांगितले होते.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »