fbpx
Saturday, October 23, 2021

जव्हारच्या हुंबरणे पाड्याच्या वाटेवर काटेच

जव्हार तालुक्यातील हुंबरणे हा एक आदिवासी पाडा. पाचशे लोकवस्तीचा. तसा जगापासून तुटलेलाच. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढा कालावधी लोटला तरीही इथल्या लोकांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत. येथील जनता मूलभूत नागरी सेवा, सुविधांपासूनही वंचित आहे. मुख्य म्हणजे या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे गरोदर महिला, रुग्ण आणि शाळकरी विद्यार्थी यांचे हाल होत आहेत.

इथे जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने गावात जाताना दगडगोट्यांची खडतर वाट तुडवून जावी लागते. या वाटेवरून चालणे तर मुश्किल आहेच, शिवाय वाहन चालवणेही तितकेच अवघड आहे. त्यामुळे दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. पावसाळ्यात तर परिस्थिती अजूनच बिकट होते. कुणी आजारी असेल तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी अक्षरश: झोळीचा वापर करावा लागतो. विद्यार्थ्यांनाही  शाळेत जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने पायपीट करतच जावे लागते.

गावाला भेडसावणारी अजून एक मोठी समस्या आहे ती पाण्याची. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथील महिलांना अर्धा ते एक तास पायपीट करून खोल दरीत उतरून डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागते.

गावात वीजही नाही. मात्र शासनाने गावात वीज असल्याचे गृहीत धरून शिधावाटप केंद्रांवर रॉकेलचे वाटप करणेही बंद केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना खाद्यतेलाचे दिवे लावावे लागत आहेत. या सगळ्या अडचणी कधी दूर होणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »