fbpx
Saturday, October 23, 2021

IPL 2020, RCB vs MI : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय..!

दुबई , 28 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या हंगामातील दहाव्या सामन्यात काल सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने  मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळरूच्या संघाने 20 षटकांत मुंबईच्या संघासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईचा संघही 201 धावाच करू शकला. ज्यामुळे दोन्ही संघामध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाने केवळ 7 धावा केल्या. या लक्ष्याचे पाठलाग करत बंगळरूच्या संघाने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरूद्ध सामन्यात नाणेफेक जिंकूण मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सविरुद्ध 201 धावांचा डोंगर तयार केला.

बंगळुरुने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सरुवात खराब झाली आहे. मुंबईने 100 धावांच्या आत आपले 4 फलंदाज गमावले होते. मात्र, इशान किशन आणि कायरन पोलार्डने मुंबईच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तुफान फलंदाजी केली. परंतु, त्यांच्या प्रयत्नाला अपयश आले आणि हा सामना टाई झाला. आयपीएलच्या पहिल्या नऊ सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर होता. तर, रॉयल चॅलेंजर्सचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र आजच्या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्सचा संघ थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, मुंबई इंडियन्सच्या संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे.  दरम्यान, बंगळुरुकडून एबीडीने सर्वाधिक 24 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यात 4 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तसेच शिवम दुबने शानदार 27 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि अॅरॉन फिंच या दोघांनीही अर्धशतकी कामगिरी केली. या सलामीवीर जोडीने अनुक्रमे 54 आणि 52 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »