fbpx
Saturday, October 23, 2021

IPL 2020, KXIP vs CSK : तुफानी बॅटिंग करत, चेन्नईच्या किंग्सची पंजाबवर 10 विकेट्सने मात..!

दुबई, 5 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या हंगामातील सोळाव्या  सामन्यात काल  एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. आजच्या या विजयासह सीएसकेने (CSK) आयपीएलमधील (IPL) यंदा पराभवाची मालिका मोडली. सलग तीन पराभवानंतर सीएसकेचा हा पहिला विजय ठरला. किंग्स इलेव्हनने आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून सीएसकेला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिले होते, जे ‘येलो आर्मीने’ अगदी सहज गाठले. सीएसकेचा आजवर खेळलेल्या पाच सामन्यांपैकी हा दुसरा विजय ठरला.

यापूर्वी आयपीएलच्या सलामी सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर त्यांना सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले. सीएसकेचे सलामी फलंदाज वॉटसन 83 आणि डु प्लेसिस 87 धावा करून नाबाद परतले. पंजाबच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. यापूर्वी, कर्णधार केएल राहुलचं धडाकेबाज अर्धशतक आणि निकोलस पूरनच्या तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 178 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत वॉटसन आणि डु प्लेसिस दोघांनी तुफान फटकेबाजी करत अर्धशतके ठोकली आणि संघाला शतकी सलामी मिळवून दिली.

दोन्ही सलामी फलंदाजांच्या नाबाद अर्धशतकी डावाच्या जोरावर सीएसकेने एकही विकेट न गमावता मोठा विजय नोंदवला. सीएसकेच्या विजयासह किंग्स इलेव्हनचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा पराभव ठरला. पंजाबच्या डावात कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवालने अर्धशतकी सलामी दिली. मयंकला चांगली सुरूवात मिळाली पण तो 26 धावांवर बाद झाला. यंदा आयपीएलमधील पहिला सामना खेळणारा मनदीप सिंह देखील चांगल्या सुरूवातीनंतर 17 धावांवर माघारी परतला. त्यानंतर पूरन आणि राहुलमी दमदार भागीदारी करून संघाचा डाव सावरला. या दोघांनी 58 धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने यंदाचे आपले तिसरे अर्धशतक ठोकले. पण, शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात पुनरागमन करून दिल व पंजाबला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »