fbpx
Saturday, October 23, 2021

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना तीव्र पोटदुखी; लीलावती रुग्णालयात दाखल!

 

मुंबई, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र पोटदुखीमुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचे ट्विट स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून ठीक झाले होते.”तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल”, असे ट्वीट धंनजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर अकरा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते 14 दिवस होम क्वारंटाईन होते.

 

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »