fbpx
Saturday, November 27, 2021

corona virus: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण..!

मुंबई 29 ऑक्टोबर : वैश्विक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा धोका सर्वसामान्यांपासून ते राजकारण, क्रीडा चित्रपट तसेच इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांमधील लोकांना जाणवू लागला असताना आता अशातच राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर राज्यातील मंत्र्यांची आज (29 ऑक्टोबर) मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील मंत्रालयात दाखल झाले. मात्र कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी जराही वेळ न घालवता तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

– दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय:

नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बरा होईन आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होईन असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करोनाची बाधा झाली आहे . दरम्यान याआधी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, बच्चू कडू, हसन मुश्रीफ, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधल्या सुमारे 15 ते 16 मंत्र्यांना करोनाची बाधा झाली. ते बरेही झाले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »