fbpx
Saturday, October 23, 2021

कोरोनाचा मोर्चा मुंबईकडून दिल्लीकडे:  मुंबईतला वेग मंदावला तर दिल्लीत थैमान सुरु!

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : जागतिक महामारी असलेल्या करोना व्हायरसचे देशातील वाढते  थैमान आता  काही प्रमाणात कमी होत असल्याचे  दिसत असताना राजधानी दिल्लीत मात्र कोरोनाचा विळखा दिवसोंदिवस वाढतोय. दिल्लीत काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत तब्बल 7174 नवे कोरोनाबाधित नोंदवण्या आले आहेत. आजवर संपूर्ण देशात 24 तासात वाढलेली हा सर्वात मोठा आकडा आहे. दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये 7002 रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीने त्याच्या पुढेही मजल मारली आहे. जुलै महिन्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण केलं म्हणून दिल्ली मॉडेलची चर्चा सुरु होती. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. ज्या दिल्लीत अगदी मागच्या दहा दिवसांपर्यंत दिवसाला दोन-अडीच हजार पेशंट सापडत होते, तो आकडा वेगाने दुप्पट तिप्पट होऊ लागला आहे.

सणासुदीच्या तोंडावर लोकांचा निष्काळजीपणा, वाढती थंडी आणि  प्रूदषण अशी तीन कारणं दिल्लीतल्या वाढीमागे सांगितली जात आहेत. पुढचे तीन महिने दिल्ली, उत्तर भारतासाठी धोक्याचे आहेत असंही तज्ज्ञ म्हणत आहेत. त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व बंधनं तातडीने शिथील केली होती. मुंबईत आता कुठे हॉटेल, रेस्टाँरंट सुरु आहेत. दिल्लीत ती सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती. दिल्लीतली मेट्रोही 7 सप्टेंबरपासूनच सुरु झाली होती.

दरम्यान, एकीकडे दिल्लीत दिवसाला 7 हजार पेक्षा जास्त केसेस…तर दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोनाची  हीच संख्या एक हजारपेक्षा कमी. ज्या मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक होता तिथे आता परिस्थिती सुधारतेय, तर दुसरीकडे दिल्लीत मात्र कोरोना भयानक वेगाने वाढतोय. दिल्लीत कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4 लाख 23 हजार इतका तर आहे. तर आजवर 6, 833 कोरोना बळी ठरले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »