fbpx
Saturday, November 27, 2021

संपूर्ण देशातील जनतेला करोनाची लस मोफत मिळणार; केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची माहिती

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने मागच्या आठवडयात आपला जाहीरनामा घोषित केला आहे. त्यामध्ये त्यांनी एनडीएचे सरकार सत्तेत आले तर बिहारच्या जनतेला मोफत कोरोनाची लस देणार असल्याचं सांगितलं होत . भाजपानं दिलेल्या या आश्वासनावरून देशभरात गदारोळ सुरू झाल्यावर आता देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे.

बिहारमध्ये करोनावरील लस मोफत देण्याच्या भाजपाच्या घोषणेवरुन मोठा वाद सुरु झाला होता. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा निवडणूक असलेल्या बिहारमध्येच नाही, तर सर्वात मोफत लस मिळाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यावरूनच आता प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे सारंगी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तर पंतप्रधान मोदींनी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया लशी बनवत असून, त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत असे म्हणाले होते. प्रताप सारंगी हे पशुसंवर्धन, डेअरी, मासळी खात्याचे राज्यमंत्री आहेत. ओदिशाच्या अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लस सर्वांना मोफत मिळणार असल्याचे सांगतिल आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
3,027FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »