fbpx
Saturday, October 23, 2021

दिलासादायक: देशात गेल्या २४ तासात करोनाबाधितांंपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक!

 

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर :  करोना व्हायरसचे देशासह राज्यातील वाढते  थैमान आता  कमी होताना दिसत असून करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची  गती आता  मंदावली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात नव्या करोना  बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी करोनावर मात केली आहे. तर,  ५० हजार ३५७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहचली आहे.

सणासुदीचे दिवस असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने, करोनाबाधितांच्या संख्येतही काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशातील एकूण ८४ लाख ६२ हजार ८१ करोनाबाधितांमध्ये ५ लाख १६ हजार ६३२ अॅक्टिव्ह केसेस, तर  डिस्चार्ज मिळालेले ७८ लाख १९ हजार ८८७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २५ हजार ५६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. तर देशभरात ६ नोव्हेंबरपर्यंत ११,६५,४२,३०४ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ११ लाख १३ हजार २०९ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »