fbpx
Saturday, October 23, 2021

काँग्रेसचे फायरब्रॅन्ड नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कोरोनाची लागण!

 

जयपूर,13 नोव्हेंबर : वैश्विक महामारी असलेल्या करोना विषाणूचा धोका सर्वसामान्यांपासून ते राजकारण, क्रीडा चित्रपट तसेच इतर अनेक महत्वाच्या क्षेत्रांमधील लोकांना जाणवू लागला असताना आता अशातच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस फायरब्रॅन्ड नेते सचिन पायलट ( sachin pilot ) हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सचिन पायलट यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली. ‘आपल्या करोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे’, असं त्यांनी सांगितलं.

यानंतर सचिन पायलट यांना लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या जात आहेत. सचिन पायलट यांनी लवकर बरं व्हावं, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले. याशिवाय सचिन पायलट यांचे मित्र आणि भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे ( jyotiraditya scindia ) यांनीही त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम मिळावा, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सचिन पायलट हे लवकर बरे व्हावेत. यासाठी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असं अशोक गहलोत यांनी ट्विट केलं आहे.

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे अस्वस्थ असल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी आपण देवाला प्रार्थना करतो, असं सचिन पायलट यांचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. दरम्यान, राजस्थान सरकारच्या अनेक मंत्र्यांना अलिकडेच करोनाची संसर्ग झाला असताना आता सचिन पायलट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे .

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »