fbpx
Saturday, October 23, 2021

कर्ज हप्त्यांवरील व्याज माफीला RBI चा विरोध

कर्ज हप्त्यांवरील व्याज माफीला RBI चा विरोध
कोरोनाच्या (corona) संकटामुळे अडीच महिन्यांपूर्वी सरकारने लॉकडाऊन (lockdown) जाहीर केले. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, काही जणांना अजिबात पगार (Salary) मिळाला नाही किंवा काहींना कमी पगार मिळाला. त्यामुळे कर्जाचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न सगळ्यांमुळे उभा होता.
पण सरकारने ६ महिने कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा दिली. पण या ६ महिन्यांच्या कालावधीतील त्या रक्कमेवरील व्याज बँका (Bank) वसूल करणार आहेत. यालाच आक्षेप घेणारी आणि ६ महिन्यांच्या कालावधीतील व्याज आकारण्यात येऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवरील सुनावणी बुधवारी झाली. त्यावेळी व्याज माफ केले तर २ लाख कोटींचा फटका बसू शकतो, त्यामुळे कोर्टाने ही मागणी मान्य करु नये असे प्रतिज्ञापत्र रिझर्व्ह बँकेतर्फे कोर्टात सादर करण्यात आले. आता या याचिकेवरील सुनावणी ५ जून रोजी होणार आहे.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »