fbpx
Friday, October 22, 2021

केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा; आयकर भरण्याची तारीख वाढवली!

मुंबई , २४ ऑक्टोबर : देशभरातील करदात्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून २०१९-२० वर्षातील वैयक्तिक आयकर भरण्यासाठीचा कालावधी वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यापूर्वी ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरण्याची अंतिम तारीख दिली होती.मात्र देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटामुळे आर्थिक वेळापत्रकही कोलमडलं आहे.

आयकर भरण्यासाठी अखेरची तारीख ३१ जुलै होती. मात्र, १३ मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारनं आयकर भरण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ करण्याच्या निर्णयाची माहिती देतानाच आयकर भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती दिली. ३१ डिसेंबरपर्यंत ही आयकर भरण्यासाठीची अंतिम तारीख असून, नागरिकांना केंद्राच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

– व्याजावरील व्याज माफ कर्जदारांनाही दिलासा:

मोदी सरकारनं कर्जदारांना मोठं गिफ्ट दिलं असून, मोरेटोरियमच्या कालावधीतील व्याजावरील व्याज माफ करण्यात आलं आहे. कर्जहप्ते स्थगिती अर्थात मोरेटोरियमच्या कालावधीतील व्याजावरील व्याजापासून कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने व्याजमाफीला हिरवा कंदील देत दिशानिर्देश जारी केले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »