fbpx
Saturday, October 23, 2021

यंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, वारकरी सांप्रदाय अन् अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार; पण यंदाचा पायी दिंडी सोहळा रद्द, वारकरी सांप्रदाय अन् अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय…!

मुंबई , 29 मे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले आहे . या कोरोनाच्या
महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील
जनतेला पडला होता. आता आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये
बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला
नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय
होणार? हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला.

आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी
दिंडी सोहळा होणार नाही. हे आता स्पष्ट झाल आहे. पुण्यात आज अजित पवारांच्या उपस्थितीत वारीबाबत
बैठक झाली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा
न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या
भूमिका मांडल्या.

वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय
अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा
विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. मानाच्या सात पालखी दशमीला पादुका
जाईल, पायी वारी जाणार नाही, पादुका विमान हेलिकॉप्टर किंवा विमान यावर निर्णय घेतला जाईल. दशमीला
यावर निर्णय होणार आहे

Related Articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Stay Connected

22,045FansLike
2,989FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Translate »